महत्त्वाचे मुद्दे :
आधुनिक भारताच्या इतिहासाची साधने
आधुनिक भारताच्या इतिहासाच्या साधनांचे मुख्य चार प्रकार पडतात.
1) भौतिक साधने
अ) वस्तू
ब) वास्तु
क) नाणी
ड) पुतळे
2) मौखिक साधने
अ) लोकगीते
ब) लोककथा
क) प्रसंगवर्णन
ड) पोवाडे
इ) ओव्या
ई) स्फूर्ती गीते
उ) मुलाखती
3) लिखित साधने
अ) पत्रव्यवहार
ब) नियतकालिके
क) वृत्तपत्रे
ड) पुस्तके
इ) परदेशी व्यक्तींनी केलेल्या नोंदी राव बेसागर
4) दृक्-श्राव्य साधने
दृकश्राव्य साधनांचे तीन उपप्रकार पडतात.
1) दृक साधने
अ) चित्रे
ब) नकाशे
क) आलेख
ड) तक्ते
2) श्राव्य साधने
अ) रेडिओ / आकाशवाणी
ब) टेपरेकॉर्डर
3) दृकश्राव्य साधने
अ) दूरदर्शन
ब) चित्रपट
क) इंटरनेट
भौतिक साधने :
अ) इमारती व वास्तू :
(1) ब्रिटिश सत्ताधीश आणि भारतीय संस्थानिक यांच्या राज्यकारभाराचा कालखंड हा आधुनिक भारताच्या इतिहासाचा कालखंड मानला जातो.
(2) या काळात विविध इमारती, पूल, रस्ते, पाणपोया, कारंजी यांची उभारणी झाली.
(3) इमारतींमध्ये ब्रिटिशांच्या कामकाजाची कार्यालये, संस्थानिकांचे राजवाडे, नेत्यांची व क्रांतिकारकांची निवासस्थाने, किल्ले, तुरुंग यांचा समावेश आहे.
(4) स्वातंत्र्यप्राप्तीनंतर यांतील काही वास्तू आता 'राष्ट्रीय स्मारके' म्हणून घोषित केल्या आहेत.
(5) काही इमारतींमध्ये संग्रहालये उभारण्यात आली आहेत.
(6) या वास्तूंवरून तत्कालीन इतिहास, स्थापत्यशास्त्र (वास्तुबांधणी शास्त्र-architecture) व आर्थिक सुबत्ता यांची माहिती मिळते.
महत्त्वाचे - वस्तुसंग्रहालये :
(1) वस्तुसंग्रहालयांत प्राचीन वस्तू, चित्रे, छायाचित्रे यांसारख्या विविध वस्तूंचे जतन केले जाते.
(2) आधुनिक काळातील वास्तूंतील संग्रहालये :
(i) अंदमान येथील सेल्युलर जेल स्वातंत्र्यवीर सावरकर
(ii) मुंबई येथील मणिभवन - महात्मा गांधी
(iii) वर्धा येथील सेवाग्राम आश्रम - महात्मा गांधी
(iv) पुणे येथील आगाखान पॅलेस - महात्मा गांधी
ब) पुतळे आणि स्मारके:
(1) स्वातंत्र्यपूर्व व स्वातंत्र्योत्तर काळांतील लब्धांत भाग घेणाऱ्या अनेक थोर व्यक्तींचे पुतळे उभारले आहेत.
(2) या पुतळ्यांच्या दर्शनी भागात पाटीवर त्या व्यक्तीसंबंधी थोडक्यात सर्व माहिती लिहिलेली असल्याने हे पुतळे इतिहासाच्या अभ्यासाच्या दृष्टीने महत्त्वाचे ठरतात. उदा., शिवाजी महाराज, लोकमान्य टिळक.
(3) पुतळ्यांप्रमाणेच विविध घटनांच्या स्मृतिप्रीत्यर्थ अनेक स्मारकेही उभारली आहेत. उदा., फ्लोरा फाउंटन म्हणजेच हुतात्मा स्मारक (मुंबई).
(4) पुतळे व स्मारके यांवरून त्या काळातील वास्तुकला, वास्तूशी संबंधित घटना इत्यादींविषयी माहिती मिळते.
लिखित साधने
अ) वृत्तपत्रे व नियतकालिके यांतून मिळणारी माहिती :
(1) समकालीन घटनांविषयी माहिती मिळते.
(2) एखाद्या घटनेचे सखोल विश्लेषण वाचावयास मिळते.
(3) विविध घटनांसंबंधी मान्यवर व तज्ज्ञ व्यक्तींची मतमतांतरे वाचावयास मिळतात.
(4) संपादकांची अग्रलेखांतील त्यांची मते वाचावयास मिळतात.
(5) त्या त्या काळातील राजकीय, सामाजिक, आर्थिक, सांस्कृतिक घडामोडींची माहिती मिळते.
(ब) स्वातंत्र्यपूर्व काळातील वृत्तपत्रे :
(1) ज्ञानोदय
(2) ज्ञानप्रकाश
(3) केसरी
(4) दीनबंधू
(5) अमृत बझार पत्रिका
(क) स्वातंत्र्यपूर्व काळातील नियतकालिके :
(1) निबंधमाला (मासिक) विष्णुशास्त्री चिपळूणकर
(2) प्रभाकर (साप्ताहिक) भाऊ महाजन 'प्रभाकर' या साप्ताहिकातून लोकहितवादी यांची 'शतपत्रे' प्रसिद्ध झाली.
(3) मूकनायक (पाक्षिक) डॉ. बाबासाहेब आंबेडकर.
(ड) स्वातंत्र्यपूर्व काळातील वृत्तपत्रे व नियतकालिके यांची कार्ये :
(1) लोकजागृती व लोकशिक्षण करणे.
(2) इंग्रज (ब्रिटिश) सरकारची धोरणे व त्यांचे भारतावरील परिणाम दाखवून देणे.
(3) अंधश्रद्धा, रूढी, परंपरा यांवर टीका करून वैज्ञानिक दृष्टिकोनाचा विकास करणे.
(4) भारतीय संस्कृतीवर व सामाजिक घटनांवर भाष्य करून प्रबोधन करणे.
(5) पाश्चात्त्य विद्या, कला व मूल्ये भारतीय लोकांपर्यंत नेणे.
(ई) डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि वृत्तपत्रे व नियतकालिके :
(1) जानेवारी 1920 मध्ये 'मूकनायक' या नावाचे पाक्षिक सुरू केले.
(2) एप्रिल 1927 मध्ये 'बहिष्कृत भारत' हे पत्र सुरू केले.
(3) 'जनता व प्रबुद्ध भारत' ही वृत्तपत्रे चालवली.
(4) सामान्य जनतेचे प्रबोधन व संघटन करणे हा त्यांचा वृत्तपत्र लेखनामागील हेतू होता.
(फ) नकाशे व आराखडे :
(1) भारतातील विविध प्रांतांचे आणि शहरांचे शास्त्रशुद्ध पद्धतीने सर्वेक्षण करून नकाशे तयार करण्यासाठी ब्रिटिश सरकारने 'सव्र्व्हे ऑफ इंडिया' हा स्वतंत्र विभाग स्थापन केला.
(2) नकाशांवरून शहरांचे वा त्या ठिकाणांचे बदलते स्वरूप अभ्यासता येते.
(3) वास्तूंच्या आराखड्यांवरून स्थापत्यशास्त्राच्या प्रगतीची माहिती मिळते. उदा., 'मुंबई पोर्ट ट्रस्ट' विभागाकडे मुंबई बंदराचे मूळ आराखडे आहेत. या आराखड्यांवरून मुंबईच्या नागरी विकासाची माहिती मिळते.
4. मौखिक साधने :
(अ) स्फूर्तिगीते :
(1) स्वातंत्र्य चळवळीच्या काळात भारतीय समाजाला स्फूर्ती व प्रेरणा देण्याकरिता अनेकांनी स्फूर्तिगीते लिहिली.
(2) त्यांतील काही लिखित स्वरूपात उपलब्ध आहेत.
(3) स्फूर्तिगीतांतून स्वातंत्र्यपूर्व काळातील परिस्थिती, स्वातंत्र्य आंदोलनामागील प्रेरणा यांबद्दल माहिती मिळते.
(ब) पोवाडे :
(1) स्फूर्तिगीतांप्रमाणेच लोकांमध्ये प्रेरणा व चैतन्य निर्माण करण्यासाठी पोवाडे रचले गेले.
(2) पोवाड्यांमधून ऐतिहासिक घटनांची व व्यक्तींच्या कार्यांची माहिती मिळते.
उदा., 1857 चा स्वातंत्र्यलढा, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनावर आधारित पोवडा इत्यादी.
(3) सत्यशोधक समाजाने पोवाड्याच्या माध्यमातून शोषित वर्गात जागृती निर्माण केली.
5. दृक्, श्राव्य आणि दृक्-श्राव्य साधने :
(अ) दृक् साधन-छायाचित्रे :
(1) छायाचित्रण कलेचा शोध लागल्यावर छायाचित्रे हे दृक् साधन आधुनिक भारताच्या इतिहासाचे महत्त्वाचे साधन बनले.
(2) पूर्वी घटना आणि व्यक्तींची चित्रे काढली जात. परंतु त्यात काल्पनिकतेचे प्रमाण अधिक असल्यामुळे ती विश्वसनीय
नसत; म्हणून छायाचित्रे काढण्यात येऊ लागली. (3) छायाचित्रांमधून वस्तु, प्रसंग आणि व्यक्ती यांची दृश्य स्वरूपात माहिती मिळते; म्हणून छायाचित्रे हे विश्वसनीय साधन मानले जाते.
(4) व्यक्तीच्या छायाचित्रावरून व्यक्तीचा पोशाख व ती व्यक्ती कशी दिसत होती हे समजते; तर प्रसंगाच्या छायाचित्रावरून तो प्रसंग नजरेसमोर उभा राहतो आणि वास्तूच्या छायाचित्रावरून त्या वास्तूचे स्वरूप लक्षात येते.
(ब) श्राव्य साधन - ध्वनिमुद्रिते (रेकॉर्ड्स) :
(1) ध्वनिमुद्रण तंत्राचा शोध लागल्यामुळे ध्वनिमुद्रिते रेकॉर्ड्सद्वारे नेत्यांची भाषणे व गीते, संगीत इत्यादींची निर्मिती आणि साठवण केली गेली. उदा., रवींद्रनाथ टागोरांनी स्वतः गायलेले 'जन गण मन' हे राष्ट्रगीत, सुभाषचंद्र बोस यांचे भाषण इत्यादी.
(2) श्राव्य साधनाद्वारे तत्कालीन विचारप्रवाह, सामाजिक व राजकीय स्थिती यांची माहिती मिळते.
(क) दृक्-श्राव्य साधन - चित्रपट :
(1) चित्रपट हा आधुनिक तंत्रज्ञानाचा एक आविष्कार आहे.
(2) सन 1913 मध्ये दादासाहेब फाळके यांनी भारतीय चित्रपटसृष्टीचा पाया घातला.
(3) भारतीय स्वातंत्र्यलढ्यातील दांडी यात्रा-मिठाचा सत्याग्रह, चले जाव आंदोलन इत्यादी प्रसंगांच्या ध्वनि चित्रफिती उपलब्ध आहेत.
(4) ध्वनि चित्रफितींमुळे घडलेल्या घटना आपल्याला जशाच्या तशा पाहायला मिळतात.
ऐतिहासिक साधनांचे जतन :
(1) प्राचीन आणि मध्ययुगीन काळांच्या तुलनेत आधुनिक भारताच्या इतिहासाचा अभ्यास करण्यासाठी विपुल साहित्य उपलब्ध आहे.
2) भौतिक व लिखित साहित्य हे वस्तुसंग्रहालये व अभिलेखागारांमध्ये जतन करून ठेवले आहे.
3) ही साधने म्हणजेच आपल्या इतिहासाचा समृद्ध वारसा आहे. आपल्या भावी पिढ्यांसाठी आपण त्यांचे जतन केले पाहिजे.
No comments:
Post a Comment