8 वी NMMS इतिहास युरोप आणि भारत सराव चाचणी 01
NMMS / MTS इत्यादी विविध स्पर्धा परीक्षेसाठी उपयुक्त अशी इतिहास विषयाच्या इतिहासाची साधने या घटकावर आधारित सराव चाचणी सोडवा.
राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटक विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती योजना परीक्षा (NMMS) ही इयत्ता आठवीमध्ये घेतली जाणारी एक महत्त्वाची स्पर्धात्मक परीक्षा आहे. अखिल भारतीय पातळीवर NMMS शिष्यवृत्तींची संख्या एक लाख इतकी असून, महाराष्ट्रासाठी हा कोटा 11.682 इतका अधिक आहे. या शिष्यवृत्ती परीक्षेत पात्र ठरणाऱ्या विद्यार्थ्यांना पुढील पाच वर्षांसाठी दरमहा ₹ 1,000/- (वार्षिक ₹ 12,000/-) इतकी शिष्यवृत्ती दिली जाते.
अशा या महत्त्वपूर्ण परीक्षेसाठी अदद्ययावत अभ्यासक्रम आणि परीक्षा परिषदेच्या प्रश्नपुस्तिका यांनुसार NMMS इयत्ता आठवी सराव चाचणी देताना आम्हांला अत्यंत आनंद होत आहे.
National Means-cum-Merit Scholarship Scheme Examination (NMMS) अर्थात 'राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटक विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती योजना परीक्षे' साठी पुढीलप्रमाणे दोन पेपर्स आहेत :
पेपर 1:
बौद्धिक क्षमता चाचणी MAT (90 गुण) । वेळ 90 मिनिटे।
पेपर 2:
शालेय क्षमता चाचणी SAT (90 गुण) । वेळ 90 मिनिटे। (सामान्य विज्ञान, सामाजिक शास्त्रे व गणित)
NMMS ची मार्गदर्शके MTSE महाराष्ट्र प्रज्ञा शोध परीक्षा व तत्सम अन्य स्पर्धात्मक परीक्षांसाठीही अत्यंत उपयुक्त आहेत.
सराव चाचणीच्या साहाय्याने विद्यार्थ्यांचा या शिष्यवृत्ती योजना परीक्षेचा परिपूर्ण अभ्यास होईल आणि ते या परीक्षेत सुयश संपादन करू शकतील, असा विश्वास आम्हांस वाटतो.
Tags:Jnv Paper, Practice tet
इतिहास NMMS
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment